जाह्नवी कपूरने केले खास फोटोशूट, ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसला रेट्रो अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 06:00 AM2020-11-11T06:00:00+5:302020-11-11T06:00:00+5:30

आजच्या नायिका बॉलीवुडच्या सिनेमात विविधरंगी भूमिका साकारतात. काही तरी हटके करण्याकडे अभिनेत्रींचा अधिक कल असतो. मग हा प्रयोग लूकमध्ये असो किंवा भूमिकेतील नाविन्यबाबतचा. गेल्या काही वर्षात तर या अभिनेत्रींचं रेट्रो लूकबाबतचं प्रेम लपून राहिलेलं नाही. अभिनेत्री जान्हवी कपूरला अशाच रेट्रो लूकची भुरळ पडलीय.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे जान्हवीन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केलीय.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.सोशल मीडियावर सध्या जान्हवीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी कलाकुसरही पाहायला मिळत आहे.

तिचा मेकअप आणि तिने घातलेले दागिणेही लूकला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.

या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पारंपरिक अंदाजाप्रमाणे वेस्टर्न आऊफिटमध्येही ती खूप सुंदर दिसते.

लाल रंगाच्या साडीवरील जान्हवीचे प्रेम नेहमीच दिसून येते.