Year Ender 2024: ब्रेकअप अन् घटस्फोट! मलायका-अर्जुन ते हार्दिक-नताशा, या सेलिब्रिटींच्या वाट्याला आलं विरहाचं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:40 IST
1 / 8२०२४ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक कलाकारांचे ब्रेकअप झाले. तर काही सेलिब्रिटी घटस्फोट घेत वेगळे झाले. 2 / 8यावर्षी सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची. अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. 3 / 8क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला. ४ वर्षांनी हार्दिक-नताशा घटस्फोट घेत वेगळे झाले. 4 / 8एआर रहमानचादेखील २९ वर्षांचा संसार या वर्षी मोडला. पत्नी सायरा बानूशी घटस्फोट घेत त्यांनी वेगळं झाल्याचं जाहीर केलं. 5 / 8८ वर्षांच्या सुखी संसारानंतर उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांनी घटस्फोट घेतला. 6 / 8ईशा देओलनेही पती भरत तख्तानीसोबत नातं तोडलं. घटस्फोटानंतर ते दोघे आता वेगळे राहतात. 7 / 8धनुष आणि ऐश्वर्या या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कपलने २०२२ साली घटस्फोट जाहीर केला होता. यावर्षी त्यांच्या घटस्फोट मंजूर झाला. 8 / 8अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपचीदेखील प्रचंड चर्चा रंगली.