Join us

घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 1:22 PM

1 / 8
26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता. या घटनेला अनेक वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.
2 / 8
मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन 'मेजर' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा बालपणापासून ते मेजर होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
3 / 8
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 2013 चा द अ‌ॅटक ऑफ 26/11 हा चित्रपट रोमेल रॉड्रिग्ज यांच्या 'कसाब: द फेस ऑफ 26/11' या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार आणि पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबबद्दल आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. हा चित्रपट Voot वर उपलब्ध आहे.
4 / 8
2019 मध्ये प्रदर्शित झालेला हॉटेल हा चित्रपट मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात देव पटेल, आर्मी हॅमर, नाझानिन बोनियाडी, अनुपम खेर, टिल्डा कोभम-हर्वे, जेसन इसाक, सुहेल नय्यर, नागेश भोसले आणि नताशा लिऊ बोर्डिझो यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ZEE5 चाहते पाहू शकतात.
5 / 8
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये दहशतवादी स्फोट झाला, या हल्ल्यात अनेक परदेशी नागरिक अडकले आणि याभोवती चित्रपटाची कथा फिरते. निकोलस सदा दिग्दर्शित हा चित्रपट यूट्यूब आणि नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
6 / 8
मुंबई हल्ल्यावरही अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या फँटमचा समावेश आहे. 2015 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
7 / 8
दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली, या सर्व गोष्टी 'मुंबई डायरी' या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले. निखिल अडवाणी निर्मित ही सीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या वेब सिरीजमध्ये मोहित रैना मुख्य भूमिकेत आहे.
8 / 8
वन लेस गॉड हा चित्रपट त्या परदेशी पर्यटकांवर आधारित आहे, जे दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. या चित्रपटात सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लासिनेमासेलिब्रिटी