‘कोई मिल गया’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली बालकलाकार हंसिका मोटवानी काळानुसार इतकी बदलली, दिसते फारच ग्लॅमरस... By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:12 AM1 / 11'शाकालाका बूम बूम' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार हंसिका मोटवानी आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक मानली जाते.2 / 11अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.3 / 11अगदी गोंडस दिसणारी हंसिका आता ग्लॅमरस दिसू लागली आहे. हंसिका ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन दोन्ही ठिकाणी ग्लॅमरस दिसते. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. 4 / 11हंसिकाने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून डेब्यू 'आपका सुरूर' या चित्रपटाद्वारे केलं होतं.तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला होता.5 / 11याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती आणि तिने स्वत:पेक्षा 18 वर्षे मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला होता.6 / 11‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते. मग काय यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.7 / 11 लवकर मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे याकाळात बोलले गेले होते. हंसिकाची आई स्किन स्पेशालिस्ट आहे.8 / 11तिनेच हंसिकाला ग्रोथ हार्मोनल इंजेक्शन दिलेत, अशी चर्चाही रंगली होती. अर्थात हंसिकाने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही.9 / 11हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात हंसिकाची मूर्ती आहे.10 / 11हंसिका सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. हंसिका वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.11 / 11हंसिका बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येच दिसली आहे. मात्र तिने साऊथचे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications