Join us

'तुझे करिअर बर्बाद होईल !'; सैफ अली खानसोबत लग्न करण्याआधी करीना कपूरला दिला होता हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:45 PM

1 / 8
एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी २०१२ साली लग्न केले.
2 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्रीच्या जवळच्यांना सैफ अली खान सोबत लग्न करत असल्याचे समजल्यावर त्यांनी अभिनेत्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला.
3 / 8
करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकांनी तिला इतकेच सांगितले की सैफ घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे, तू खरंच सैफशी लग्न करणार आहेस का?
4 / 8
इतकंच नाही तर करीनाला काही लोकांनी असंही सांगितलं की सैफशी लग्न केल्याने तिचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.
5 / 8
त्यानंतर करीनाने विचार केला की, प्रेम करणं हा खरंच इतका मोठा गुन्हा आहे का? लग्न झाल्यावर काय होते ते पाहूया.
6 / 8
मात्र, आज सैफ आणि करीना दोघेही इंडस्ट्रीतील पॉवर कपल्समध्ये गणले जातात.
7 / 8
सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत, मोठ्या मुलाचे नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे.
8 / 8
करीना कपूर लवकरच लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे.
टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर