बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत आहे कोट्यावधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून येईल भोवळ By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:22 AM1 / 9बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज ३६वा वाढदिवस साजरा करते आहे. 2 / 9राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपले मत बेधडकपणे अभिनेत्री कंगना राणौत मांडते.3 / 9कंगना राणौतचा जन्म १९८७ मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. तिला कलाविश्वात काम करण्याची इच्छा होती. पण तिच्या कुटुंबाचा याला विरोध होता. त्यामुळे तिने वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.4 / 9वयाच्या १६व्या वर्षी घर सोडून कंगना दिल्लीत गेली. तिथे तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.5 / 9सुरुवातीच्या काळात कंगनाला अनेकवेळा लोणचे आणि पोळी खाऊन दिवस काढावे लागले होते. कारण तिला कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळत नव्हती. पण आज कंगना कोट्यावधींची मालकीण आहे.6 / 9मीडिया रिपोर्टनुसार, कंगना राणौत ९६ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. वर्षभरात कंगना ही १५ कोटींची कमाई करते. 7 / 9कंगना चित्रपटांबरोबरच जाहिरातींमध्ये देखील काम करते.8 / 9फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट सिनेमात तिने काम केले आहे.9 / 9कंगना लवकरच इमर्जन्सी या चित्रपटात झळकणार आहे. तिचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications