Cannes 2024: कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 2:08 PM1 / 10कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ला दिमाखात सुरुवात झाली आहे. यंदा भारतीय अभिनेत्रींच्या फॅशन आणि लुक्सकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.2 / 10तिने फेस्टिव्हलमधील अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका अनोख्या अवतारात दिसत आहे.3 / 10अदिती राव हैदरीनं तिच्या लूकसाठी पिवळ्या आणि काळ्या रंगसंगतीच्या फ्लोरस ड्रेसची निवड केली. यासोबत तिनेगोल्डन कानातले आणि मेसी हेअर बन केला होता. 4 / 10कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दिसला अदितीचा सुपर ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले. 5 / 10आदितीच्या फोटोवर होणारा पती सिद्धार्थही फिदा झाला आहे. अदितीच्या लूकवर सिद्धार्थने 'Oh wow!' अशी कमेंट केली. 6 / 10गौरी आणि नैनिका यांनी अदितीचा हा खास ड्रेस डिझाइन केला. या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं. तिचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.7 / 10या फोटोंमध्ये अदिती समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. आदिती राव हैदरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या सौंदर्य आणि एलिगेंससमोर कोणी टिकू शकत नाही.8 / 10आदिती इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच. आदितीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.9 / 10 कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. हे 24 मे पर्यंत सुरू राहणार आहे.10 / 10अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने साकारलेल्या 'बिब्बोजान' भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications