Deepika Padukone at Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर ‘मस्तानी’ साडीत अवतरली, कलेजा खल्लास करून गेली By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:23 AM1 / 14कान्स फेस्टिव्हल 2022 ची चर्चा सुरु आहे. सगळ्यांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत. सर्वात आधी चर्चा दीपिका पादुकोणची. 2 / 14होय, कान्स सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दीपिकाने माहौल केला. रेड कार्पेटवर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.3 / 14बॉलिवूडची ‘मस्तानी’ कान्स सोहळ्यात पहिल्याच दिवशी अशा काही लुकमध्ये दिसली की सगळेच तिच्यावर फिदा झालेत.4 / 14सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या कान्स लुकचीच चर्चा आहे. इंटरनेटवर दीपिकाच्या कान्स सोहळ्यातील फोटोंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.5 / 14 कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोण सहभागी होणार हे समजल्यापासूनच सर्वांचं तिच्याकडे लागलं होतं. यावेळी तर ती ज्युरी मेंबर्सपैकी एक होती.6 / 14कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका कोणत्या अवतारात दिसणार? तिचा लुक कसा असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर तिचा लुक समोर आला.7 / 14 या सोहळ्यात दीपिका साडी नेसून रेड कार्पेटवर अवतरली. विदेशी भूमीवर अभिनेत्रीने देसी लुक कॅरी करणंच पसंत केलं आणि तिनं सगळ्यांची मनं जिंकलीत.8 / 14ब्लॅक कलरच्या शिमरी साडीत दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. तिला पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अक्षरश: डीपीला पाहून सगळेच खल्लास झालेत.9 / 14दीपिकाची ब्लॅक शिमरी साडी सब्यसाचीने डिझाईन केलेली रेट्रो स्टाईल साडी होती. सोबत बन हेयरस्टाईल आणि डार्क आय लायनरसह तिने आपला लुक पूर्ण केला होता. 10 / 14 यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकाथार्नं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण यावेळी कान्स ज्युरीचा आहे. या सोहळ्यात भारत ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून सहभागी झाला आहे.11 / 14याशिवाय ग्रीन पँट आणि प्रिंटेट टॉप असा एक दीपिकाचा लुकही व्हायरल होतोय. या लुकमध्येही दीपिका कमालीची सुंदर दिसतेय.12 / 14तिच्या या रेट्रो लुकने सगळ्यांना घायाळ केलं. तिच्या एक एक अदा, तिच्या चेह-यावरचं हास्य सगळ्यांना खुश्श करून गेलं.13 / 14दीपिकाचा कान्समधील फर्स्ट लुक पाहून चाहते बेभान झाले आहेत. तिचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या लुकचं कौतुक होतंय.14 / 14 कान्स इव्हेंटमध्ये जाण्यापूर्वी दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या सोहळ्यासाठी ती किती उत्सुक आहे, हे तिनं सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications