Chahatt Khanna : "दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही"; अभिनेत्रीची रस्त्यात काढली छेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:15 IST
1 / 10टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने तिच्या कारकिर्दीत अनेक शोमध्ये काम केलं आहे. 'बडे अच्छे लगते हैं' आणि 'कुबूल है' द्वारे ती घराघरात लोकप्रिय झाली.2 / 10एका लेटेस्ट इंटरव्ह्यूमध्ये, अभिनेत्रीने तिच्यासोबत काही वर्षांपूर्वी घडलेल्या छेडछाडीच्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे.3 / 10चाहतने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १०-११ वर्षांपूर्वी बाईकवरुन आलेल्या दोन पुरुषांनी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी अभिनेत्रीने त्यांचीच रस्त्यात धुलाई केली.4 / 10Hauterrfly शी झालेल्या संभाषणात अभिनेत्रीने सांगितलं की, एकदा ती तिच्या दोन बहिणींसोबत कारने बाहेर जात होती.5 / 10'अचानक बाईकवरून आलेल्या दोन पुरुषांनी छेड काढायला सुरुवात केली आणि घाणेरड्या कमेंट्स करायला सुरुवात केली.'6 / 10'बाईकवरून ते आमच्या कारचा पाठलाग करत होते. मग मी कार थांबवली आणि दोघांची धुलाई करायला सुरुवात केली.' 7 / 10'त्या दोघांनीही मला मारहाण केली पण कोणीही वाचवायला आलं नाही. हे सर्व १०-११ वर्षांपूर्वी घडलं होतं.'8 / 10'त्यावेळी झालेलं भांडण हे WWE सारखं होतं. मी दोघांनाही खूप मारलं होतं... एकाचा दातच तोडला होता' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.9 / 10चाहत खन्ना दोन वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे, ती २०२३ मध्ये 'यात्रीज' चित्रपटात दिसली होती.10 / 10