Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 1:07 PM1 / 10टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या. पण तसाही ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा विसरणं शक्य नाही. अगदी सिनेमांचं नाव काढताच, यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते?2 / 102007 साली आलेल्या ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टन आठवते? होय, आम्ही बोलतोय ती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या माळवदे हिच्याबद्दल. विद्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. पण विद्याचे करिअरला याचा फार काही फायदा झाला नाही. आता ती इंडस्ट्रीतून बाहेर पडून योगा शिकवते.3 / 10सागरिका घाटगे हिने ‘चक दे इंडिया’मध्ये प्रीती सबरवालची भूमिका साकारली होती. आजही सागरिका चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखली जाते. 2017 साली सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले. लग्नानंतर सागरिकाने सिनेमांपासून दूर गेली. सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका ‘चक दे इंडिया’त दिसली होती. 4 / 10चित्राशी रावत हिने ‘चक दे इंडिया’मध्ये कोमल चौटालाची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ती फॅशन, लक, तेरे नाम लव हो गया अशा अनेक सिनेमात दिसली. काही शो सुद्धा केले. पण सध्या ती बॉलिवूडपासून जरा दुरावली आहे.5 / 10शिल्पा शुक्लाने या सिनेमात बिंदिया नाईकची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर बीए पास, के्रझी चुक्कड फॅमिली अशा सिनेमात ती दिसली.6 / 10तान्या अब्रोल हिने सिनेमात पंजाबी गर्ल बलबीर कौरची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सीआयडी, ये है आशिकी अशा शोमध्ये दिसली होती.7 / 10आलिया बोसची भूमिका साकारणारी अनयथा नायर हिने अनेक मल्याळम व हिंदी सिनेमात काम केले. वेल डन अब्बा, झूठा ही सही, फोर्स सिनेमात तिी दिसली. आता ती सिंगापूरमध्ये मोठी हेअरस्टाईलिस्ट बनलीये. तिला एक मुलगी आहे आणि या मुलीचे नाव तिने तिच्या भूमिकेच्या नावावरून आलिया ठेवले आहे.8 / 10शुभी मेहताने ‘चक दे इंडिया’मध्ये गुंजन लखानीचे पात्र साकारले होते. आता तिने अॅक्टिंगला रामराम ठोकला असून संसारात रमली आहे.9 / 10Sandia Furtado हिने सिनेमात नेत्रा रेड्डीची भूमिका साकारली होती. ती ख-या आयुष्यातही हॉकी प्लेअर होती. पण आता ती पीआर प्रोफेशनमध्ये आहे आणि पतीसोबत लंडनमध्ये स्थायिक झाली आहे.10 / 10आर्या मेनन हिने गुल इक्बालची भूमिका साकारली होती. चक दे इंडियानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले. पण नंतर अॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकला. सध्या ती अॅडव्हटायझिंग प्रोड्यूसर म्हणून काम करते. आणखी वाचा Subscribe to Notifications