'ही' लोकप्रिय नृत्यांगना आहे कुशल बद्रिकेची पत्नी; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अचंबित By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 7:00 PM1 / 10आपल्या विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.2 / 10मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कुशल गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 3 / 10'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिकेची लोकप्रियता तुफान वाढली. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.4 / 10सध्या सोशल मीडियावर कुशलच्या कुटुंबियांची चर्चा रंगली आहे. यात त्याची पत्नी कोण? ती काय करते असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. म्हणूनच, आज आपण कुशलच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.5 / 10कुशलच्या पत्नीचं नाव सुनैना बद्रिके असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.6 / 10सुनैना कथ्थक नृत्यांगना असून सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते.7 / 10विशेष म्हणजे सुनैना सौंदर्याच्या बाबतीतही अव्वल असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाही.8 / 10सुनैना कथ्थकचे डान्स क्लास घेत असल्याचं सांगण्यात येतं.9 / 10अलिकडेच कुशल-सुनैना या जोडीने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती.10 / 10कुशल बद्रिके अलिकडेच 'पांडू' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications