'मेड फॉर इच अदर' कपल कुशल ब्रदिकेच्या पत्नीविषयी या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 1:33 PM1 / 10 कुशल बद्रिके आणि सुनैना यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते.कुशल आणि सुनैनाची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.2 / 10कुशल कॉलेजमध्ये असताना एकपात्री स्पर्धेत भाग घेतला होता. ‘ती फुलराणी’मधला एका भागाच्या सादरीकरणावेळी एका तरुणीने कुशलचं लक्ष वेधून घेतले होती. ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती सुनैना होती. 3 / 10काही वर्षांनी योगायोगाने सुनैनासोबत कुशलला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली.आश्चर्याच्या बाब म्हणजे सुनैनाने कुशलच्या बायकोची भूमिका साकारली होती. 4 / 10 तिच्याबरोबर काम करताना तो तिच्या प्रेमात पडला होता.दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढु लागल्या. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 5 / 10आश्चर्य म्हणजे सुनैनानेच कुशलला लग्नासाठी प्रपोज केले होते. कुशलनेही लगेचच होकार दिला. घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला थोड्याफार प्रमाणात विरोधही झाला.6 / 10ोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि दोघांचं शुभमंगल पार पडलं.सुनैना खंबीरपणे कुशलच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते,त्याला पाठिंबा देते. 7 / 10करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी सुनैना त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि कुशलचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. 8 / 10कुशलच्या आजवरच्या प्रवासात तिचा मोठा वाटा आहे. लग्नानंतर घर आणि मुलगा यांच्या जबाबदारीमुळं तिची नृत्याची आवड मागं पडली होती9 / 10 सुनैना तिच्या कलेची आवड जोपासत आहे.सोशल मीडियावर ती अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असते. कुशलला देखील तिच्या या कलेचं कौतुक करत असतो.10 / 10 कुशल बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवत एन्जॉय करत असतो. कुशलचे सगळ्याच फोटोंना चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications