Join us

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेचा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 8:00 AM

1 / 10
छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली.
2 / 10
श्रेयाचे अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.
3 / 10
श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.
4 / 10
२७ डिसेंबर २०१५ रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला.श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे.एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली.
5 / 10
मालिकेच्या सेटवर निखील श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र काही तरी दोघांमध्ये बिनसलं आणि वाद झाला. त्यामुळे दोघं एकमेकांपासून दूर गेले होते.
6 / 10
मात्र त्यांच्यातला हा दुरावा काही फार काळ राहिला नाही. कारण एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला.
7 / 10
यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरु झाला.त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती.
8 / 10
त्यामुळे निखीलने श्रेयाला तू सिंगल आहेस का अशी विचारणा केली. त्यावर श्रेयाने हो असं उत्तर देताच निखीलने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केले.
9 / 10
श्रेयानेही त्याला हो असं उत्तर दिलं.यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांचं लग्न जुळलं
10 / 10
निखीलसाठी हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होते. मात्र श्रेयासाठी तसं नव्हते.मात्र आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत.
टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या