By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:53 IST
1 / 7विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सध्या जगभरात गाजत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. 2 / 7'छावा' सिनेमातील कलाकारांचंही कौतुक होत आहे. या सिनेमातील एका बालकलाकाराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. 3 / 7त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्याची हेअरस्टाइल हुबेहुबे सलमान खानसारखी दिसत आहे. 4 / 7तर त्याचे डोळेही सलमानसारखेच दिसत आहेत. चाहते सलमानसोबत या चिमुकल्याची तुलना करत आहेत. 5 / 7या बालकलाकाराचं नाव ध्वज गौर असं आहे. त्याने 'छावा' सिनेमात रामराजे महाराज यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. 6 / 7ध्वज गौरने याआधीही काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १४०७ फॉलोवर्स आहेत. 7 / 7ध्वजच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर 'छावा' सिनेमाबाबत अनेक पोस्ट केल्याचंही पाहायला मिळत आहे.