Join us

'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग

By देवेंद्र जाधव | Updated: March 21, 2025 13:15 IST

1 / 7
फोटोत दिसणारा हा अभिनेता 'छावा' सिनेमातील एका भुमिकेमुळे लोकप्रिय झालाय. या अभिनेत्याने कुस्तीपटू म्हणून एक काळ गाजवला आहे. हा अभिनेता म्हणजे सुखविंदर सिंग ग्रेवाल.
2 / 7
छत्रपती संभाजी महाराज जेव्हा बुऱ्हाणपूरला लूट करतात तेव्हा तिकडे असणाऱ्या मुघलांच्या सेनापतीच्या भूमिकेत सुखविंदर झळकला होता.
3 / 7
सुखविंदरने 'छावा' सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. शरीरयष्टीने धिप्पाड असलेला मुघलांचा सरदार म्हणून सुखविंदर शोभून दिसला.
4 / 7
'छावा' सिनेमातील सुखविंदर आणि विकी कौशल याांच्यातील अॅक्शन सीन्सही चांगलेच गाजले. अनेकांना माहित नसेल की सुखविंदरने जगप्रसिद्ध कुस्तीपटू द ग्रेट खलीच्या अंतर्गत प्रशिक्षण घेतलं आहे
5 / 7
सुखविंदर खलीच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन WWE मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर कुस्ती सोडून सुखविंदरने अभियनाची वाट निवडली
6 / 7
चिरंजीवी सोबत 'भोला शंकर', सुपरस्टार अजितसोबत 'विस्वासम' अशा सिनेमांमध्ये सुखविंदरने काम केलं. सुखविंदरच्या सर्व भूमिका लक्षवेधी ठरल्या.
7 / 7
'छावा'आधी शाहरुखच्या 'जवान' सिनेमात सुखविंदरने खलनायकाची भूमिका साकारली होती. सुखविंदरने त्यावेळी पडद्यामागे शाहरुखसोबत खास फोटो काढला होता.
टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाशाहरुख खानबॉलिवूड