मानसीच्या लग्नाला यायचं हं, काऊंटडाऊन सुरू, पाहा दोघांचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:26 AM1 / 11 लग्न घटिका समीप आली करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.2 / 11 सध्या लग्नाच्या तयारीत बिझी असली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह तिचा आनंद शेअर करताना ती दिसते. 3 / 11 लग्नानंतर मिसेस बनत मानसी नाईकचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.4 / 11 नवीन वर्षात 19 जानेवारी 2021 रोजी प्रदीप खरेरासोबत मानसी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. 5 / 11 मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.6 / 11 तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. 7 / 11 प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 8 / 11 एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. 9 / 11 प्रदीप खरेरा सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.10 / 11'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या सिनेमांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.11 / 11मानसी नाईकचे लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications