Join us

IN PICS: पत्नी जेनिफरच्या आठवणीत ढसाढसा रडले होते शशी कपूर, हटके होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 1:08 PM

1 / 9
दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांची लव्हस्टोरी बॉलिवूडची सर्वाधिक सुंदर लव्हस्टोरी होती.
2 / 9
या लव्हस्टोरीची सुरूवात जितकी सुंदर होती तितकाच अंत दु:खद होता़ जेनिफरच्या निधनानंतर 31 वर्षे शशी कपूर एकाकीपणाचे दु:ख सोसत राहिले. 1984 साली आजच्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला जेनिफर शशी कपूर यांना मागे सोडून या जगातून कायमची निघून गेली होती.
3 / 9
जेनिफर तिच्या वडिलांचे नाटक ‘शेक्सपिएराना’च्या निमित्ताने नाटकातील कलाकारांसोबत भारत दौ-यावर आली होती. त्या दरम्यानच तिची शशी कपूर यांच्याशी पहिली भेट झाली होती.
4 / 9
पहिल्या भेटीतच शशी कपूर जेनिफरच्या प्रेमात पडले होते. या पहिल्या भेटीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले.
5 / 9
त्यावेळी शशी कपूर पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाचे धडे घेत होते. त्यानंतर ते जेनिफरसोबत ‘शेक्सपिएराना’च्या टीममध्ये ते सामिल झाले.
6 / 9
जेनिफर थिएटर ग्रुपसोबत सिंगापूरला जाऊन शशीजींनी थिएटरही केले. त्यानंतर या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले.
7 / 9
एका नाटकाच्या शोसाठी उटीला गेले असताना शशी व जेफिफर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. शशी यांच्या वहिनी गीता बाली त्या क्षणाच्या साक्षीदार होत्या.
8 / 9
1958 साली दोघे लग्नबंधनात अडकले. त्यावेळी शशी कपूर अवघ्या 20 वर्षांचे होते, तर जेनिफर 24 वर्षांची.
9 / 9
1982 साली जेनिफरला कॅन्सर असल्याचे निदान झाले. शशी कपूर यांनी जेनिफरला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. अगदी मुंबईपासून ते लंडनपर्यंतच्या डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार केलेत. पण 7 सप्टेंबर 1984 रोजी जेनिफरने जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या निधनानंतर शशी कपूर एकाकी पडले. त्यांचे हे एकाकीपण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यासोबत राहिले.
टॅग्स :शशी कपूर