चित्रपटात झळकण्यापूर्वी Deepak Chahar च्या बहिणने केलंय Web Series मध्ये काम; पाहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:26 PM1 / 9टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू दीपक चहर याची बहीण मालती चहर लवकरच चित्रपटात झळकणार आहे. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपटात झळकण्यापूर्वी ती एका वेब सीरिजमध्येही (Web Series) झळकली होती.2 / 9मालती चहर अनेकदा आयपीएलच्या सामन्यांदरम्यान (IPL Matches) चेन्नई सुपर किंग्सला (CSK) सपोर्ट करताना दिसली आहे. दीपक चहर हा (Deepak Chahar) हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा एक भाग आहे आणि याव्यतिरिक्त तो टीम इंडियाचाही भाग आहे.3 / 9दीपक चहरची बहीण मालती ही एक मॉडेल आहे. ती सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. तसंच अनेकदा ती आपले ग्लॅमरस फोटो (Glamorous Photos) शेअर करत असते. अनेकदा ती दीपक चहरसोबतही फोटोस शेअर करत असते.4 / 9मालतीचे सोशल मीडियावरही मोठे फॉलोअर्स आहेत. तिला पुन्हा स्क्रिनवर पाहणं ही तिच्या फॅन्ससाठी एक खास ट्रिट असणार आहे. मालतीनं चित्रपटात येण्यापूर्वी अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. तसंच letsmarry.com या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.5 / 9दीपक चहर आणि ब्रावो यांच्यासह रन द वर्ल्ड या गाण्यावर तिनं परफॉर्म केलं होतं, त्यावेळी ती अधिक लाईमलाईटमध्ये आली होती. मालती आपल्या स्टनिंग पर्सनॅलिटीबाबत अनेकदा चर्चेत असते.6 / 9ती सध्या बॉलिवूड नाही, तर तामिळ चित्रपटामधून आपल्या चित्रपटातील करिअरची सुरूवात करणार आहे. ती विग्नेश शिवान आणि नयनतारा यांच्या नव्या प्रोडक्शन व्हेंचरचा Walking Talking Strawberry Ice Cream हा चित्रपट साईन केला आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.7 / 9Walking Talking Strawberry Ice Cream या चित्रपटाचा भाग बनून मला आनंद होत आहे. विनायक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नयनतारा आणि विग्नेश शिवान यांनी तो प्रोड्यूस केला असल्याचं मालती चहरनं सांगितलं. सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती शेअर केल्यानंतर अनेकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.8 / 9दीपक चहरनं जेव्हा सर्वासमोर स्टेडिअममध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा मालतीनंही सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. मालतीचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. सध्या तिचे 603K पेक्षा अधिक फॉलोवर्सही आहेत.9 / 9मालतीचा गॉर्जिअस लूक आणि कमालीचा फॅशन सेन्स तिच्या इन्स्टा प्रोफाईलवरून पाहायला मिळतो. ती मिस इंडिया अर्थ 2009, फेमिना मिस इंडिया 2014 ची सेकंड रनरअपही राहिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications