दीपिकाची बॉलिवूडमध्ये १५ वर्षे, २८ ब्रॅंड्सची अँबेसिडर आणि बरंच काही.... By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 3:54 PM1 / 5दीपिकाचा पहिला चित्रपट हा ओम शांती ओम नसून 'ऐश्वर्या' हा होता. २००६ साली दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांच्या कन्नड सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2 / 5बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी दीपिका म्युझिक व्हिडीओ मध्ये झळकली होती. संगीतकार हिमेश रेशमिया च्या नाम है तेरा या अल्बम मध्ये तिने काम केले.3 / 5दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. पण दीपिकाही राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. पी व्ही सिंधू सोबत नुकतेच तिने बॅडमिंटनची प्रॅक्टिस केली ते व्हीडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.4 / 5दीपिका तिच्या करिअरमध्ये २७ हून जास्त ब्रॅंड्स ला एंडॉर्स करते. विशेष म्हणजे केवळ भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सनेही दीपिकाला अॅंबेसिडर म्हणून जाहीर केले आहे. त्यात नुकतेच जाहीर झालेल्या फ्रान्सच्या लुईस व्हुइटन या फॅशन ब्रॅंडची दीपिका पहिली भारतीय अॅंबेसिडर आहे.5 / 5अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले होते. २००५ मध्ये तिने किंगफिशर मॉडेल ऑफ द इयर हे टायटल मिळवले. त्याच वर्षी तिने फॅशन क्षेत्रातही पदार्पण केले. डिझायनर सुमीत वर्मा यांच्यासाठी लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केला. आणखी वाचा Subscribe to Notifications