Happy Birthday Deepika Padukone : केवळ अभिनेत्रीच नाही तर दीपिका आहे यशस्वी 'बिझनेसवुमन'; जाणून घ्या दीपिकाची कमाई किती ! By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 9:59 AM1 / 10ओम शांती ओम मधील शांतीप्रिया असो, किंवा कॉकटेल मधील व्हेरॉनिका, दीपिकाने प्रत्येच भूमिका अगदी चोख निभावल्या. तिच्या गोड हसण्याने तिने प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या मनात घर केले. उंच, गालावर खळी आणि सुंदर हास्य बघून चाहते तर घायाळच झाले. शाहरुख खानसारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत ओम शांती ओम मधून तिने पदार्पण केले. मात्र शाहरुख असतानाही ही नवी हिरोईनच जास्त भाव खाऊन गेली.2 / 10तर अभिनयाव्यतिरिक्त दीपिका इतरही कामांमध्ये व्यस्त असते. २०१५ मध्ये दीपिकाने डिप्रेशनचा सामना केला. काही वर्षांनी ती त्यातून बाहेर आली. आपल्यासारख्याच इतरही अशा मुली असतील ज्या या आजाराचा सामना करत असतील असे तिला वाटले.3 / 10दीपिकाने २०१५ सालीच द लिव लव लाफ फाउंडेशन सुरु केले. हे मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृतीचे काम करते. यानंतर तिने मोर दॅन जस्ट सॅड या मोहिमेचीही सुरुवात केली. याअंतर्गत डिप्रेशन, भीती, अस्वस्थता या गोष्टींचा सामना करणाऱ्यांसाठी डॉक्टरांशी ओळख करुन दिली.4 / 10याशिवाय दीपिकाने क्लोदिंग ब्रॅंडही सुरु केले आहे. २०१३ मध्येच तिने या क्षेत्रात पाऊल ठेवले. मिंत्रा या शॉपिंग ब्रॅंड सोबत मिळून तिने ऑल अबाऊट यू या स्वत:च्या ब्रॅंडची सुरुवात केली.यामध्ये तर ती तिचे स्वत:चे कपडेही ऑनलाईन विकते.5 / 10फॅशन नंतर तिने स्टार्टअप क्षेत्रातही गुंचतवणूक केली. का एंटरप्रायझेस हा तिचा आणखी एक बिझिनेस. २०१७ मध्ये तिने हे सुरु केले. याशिवाय तिने ड्रम फूड इंटरनॅशनल, बेलाट्रिक्स एरोस्पेस, ब्लुस्मार्ट आणि फ्रंटरो या काही कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली.6 / 10दीपिकाचे स्वत:चे इतके ब्रॅंड असताना ती इतर ग्लोबल ब्रॅंडची सुद्धा अॅंबेसिडर आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण दीपिकाच्या हस्ते करण्यात आले. भारतीयांसाठी हा सर्वात जास्त अभिमानाचा क्षण होता. 7 / 10दीपिका लुईस व्हिटॉन या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडची अॅंबेसिडर आहे. या ब्रॅंडनेच फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे केस डिझाईन केली होती. याचअंतर्गत दीपिकाला ट्रॉफिचे अनावरण करण्याचा मान मिळाला.8 / 10आता नुकतेच दीपिकाने 82 E या स्किनकेअर लाईनची सुरुवात केली आहे. यातही तिची प्रचंड गुंतवणूक आहे. जिगर शाह यांच्यासोबत मिळून तिने या ब्रॅंडची स्थापना केली आहे. यात अश्वगंधा, पचौली ग्लो असे काही प्रोडक्ट्स लॉंच केले आहेत. 9 / 10दीपिकाचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसही आहे. KA Productions असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. याअंतर्गत तिने ८३ आणि छपाक या सिनेमांची निर्मिती केली आहे. सध्या दीपिका आगामी पठाण सिनेमामुळे जास्त चर्चेत आहे. 10 / 10दीपिकाची ही अमाप गुंतवणूक बघून तिची कमाई किती असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही.रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती ३१४ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तर सध्या दीपिका बॉलिवुडमधील आघाडीची नंबर १ अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटाचे १५ ते ३० कोटी रुपये घेते. आणखी वाचा Subscribe to Notifications