By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:01 IST
1 / 9९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी ऐतिहािसक ठरला. या सोहळ्यात भारताने दोन ऑस्कर पटकावले. शिवाय या सोहळ्यातील दीपिका पादुकोण आणि तिचं भाषणही भारतीयांची मान उंचावणारं ठरलं. 2 / 9ऑस्कर सोहळ्यात दीपिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. दीपिकाच्या ऑस्कर लुकच्या सगळेच प्रेमात पडले. 3 / 9सोशल मीडियावरही तिच्या लुकचं प्रचंड कौतुक झालं. तिचा टॅटू, त्याचीही चर्चा झाली. होय, ऑस्कर सोहळ्यात दीपिकाच्या कानामागच्या टॅटूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 4 / 9९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका काळ्या रंगाचा ग्लॅमरस गाऊन घालून स्टेजवर आली. गळ्यात नाजूकसा नेकलेस, साजेसा मेकअप आणि ओठांवरचं हसू अशी दीपिका भाव खाऊन गेली.5 / 9दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या या लूकचे फोटो शेअर केलेत. या फोटोतील तिच्या कानामागे असलेल्या टॅटू पाहून चर्चा झाली नसेल तर नवल.6 / 9दीपिकाने कानामागे 82°E असा टॅटू बनवला होता. हा टॅटू पाहून अनेक चाहते कन्फ्युज झालेत. याचा अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला.7 / 9तर 82°E हे दीपिकाच्या ब्युटी ब्रँडचं नाव आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी हा ब्यूटी ब्रँड सुरु केला आहे त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे.8 / 9दीपिका 82°Eची को फाऊंडर आहे. एकंदर काय तर दीपिकाने ऑस्कर गाजवलाच, सोबत ऑस्करच्या मंचावर आपल्या या ब्रँडचंही प्रमोशन केलं.9 / 9याआधी दीपिकाने मानेच्या मागच्या बाजूला ‘RK’ नावाचा टॅटू बनवला होता. रणबीर कपूरला डेट करत असताना तिने हा टॅटू काढला होता. मात्र रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर तिने या टॅटूत बदल करून त्याला फुलांच्या डिझाईनमध्ये बदललं होतं.