Join us

Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:02 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंगचीच चर्चा आहे. होय, रणवीरनं न्यूड फोटोशूट केलं, त्याचे फोटो व्हायरल झालेत आणि रणवीर चर्चेत आला. पण सध्या चर्चा आहे ती त्याच्या व दीपिकाच्या रॅम्प वॉकची.
2 / 10
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे इंडस्ट्रीचं सर्वात लोकप्रिय कपल आहे. या कपलची तगडी फॅन फॉलोइंग आहे. हे कपल एकत्र येणं म्हणजे जणू फॅन्सची लॉटरी लागणं. शुक्रवारी असंच काहीसं घडलं.
3 / 10
होय, काल शुक्रवारी मनीष मल्होत्राच्या मिजवान फॅशन शो 2022 मध्ये दीपिका व रणवीर हे कपल एकत्र रॅम्पवर उतरलं. मग काय या कपलला पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
4 / 10
दीपवीर या फॅशन शोचे शो स्टॉपर होते. स्टायलिश अंदाजात दीपवीर रॅम्पवर उतरले. यावेळी या कपलचा रोमॅन्टिक अंदाजही पाहायला मिळाला.
5 / 10
रणवीर व दीपिकाने रॉयल अंदाजात रॅम्पवॉक केला. यावेळी दीपिकाने रणवीरच्या गालावर किस केला. रणवीरनेही तिच्या गालाचं चुंबन घेत, आपलं प्रेम व्यक्त केलं. हा रोमॅन्टिक क्षण पाहून फॅन्स कमालीचे क्रेझी झालेत.
6 / 10
मनीष मल्होत्राच्या या फॅशन शोला रणवीरच्या कुटुंबीयांनीही हजेरी लावली होती. पहिल्याच रांगेत रणवीरची आई अजू भवनानी आणि बहिण ऋतिका भवनानी बसल्या होत्या. करण जोहर, गौरी खान, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर असे अनेक स्टार यावेळी हजर होते.
7 / 10
दीपिकाने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लहंगा परिधान केला होता. या लहंग्यात दीपिका कमालीची सुंदर दिसत होती.
8 / 10
रणवीर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट शेरवानीत रॅम्पवर उतरला. यावर त्याने व्हाईट एम्ब्रोडिएरी केलेला कोट कॅरी केला होता. त्याचे शूज नेहमीप्रमाणे स्टायलिश होते. त्याने फ्रिल्स असलेले ब्लॅक स्टायलिश शूज घातले होते.
9 / 10
दीपिका व रणवीरच्या रॅम्पवॉकचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कपल कॅमे-यांना किलर पोझ देताना दिसतेय.
10 / 10
कपलने डिझाईनर मनीष मल्होत्रासोबतही पोझ दिली. रणवीर व दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दीपिका ‘पठान’ या सिनेमात दिणार आहे तर रणवीरचा ‘सर्कस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणमनीष मल्होत्रा