Join us

अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:47 IST

1 / 9
बारामती तालुक्यातील मोढवे गावातील सूरज चव्हाण (Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर प्रचंड चर्चेत आला होता. 'बिग बॉस'च्या घरात त्यानं अनेकदा गावात स्वत:चं घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती.
2 / 9
आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकत सुरजनं 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
3 / 9
'बिग बॉस मराठी'चा विजेता झाल्यानंतर सूरजची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट घेतली होती. तसेच त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं.
4 / 9
अजित दादांनी आपलं वचन पाळलं असून लवकरच सूरज चव्हाणचं घर बांधून होणार आहे.
5 / 9
आता रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्या गावी जाऊन त्याच्या घराच्या कामाचा प्रगतीचा आढावा ( Ajit Pawar Inspects The Construction Of Suraj Chavan's House) घेतला.
6 / 9
अजित पवार यांच्या एक्स अकाउंटवर सुरजच्या घराच्या पाहणीचे फोटो पोस्ट केले आहेत.
7 / 9
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'बिग बॉस मराठी'चा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये. कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे. अशा सूचना तिथल्या संबंधितांना दिल्या', असं सांगितलं.
8 / 9
एकिकडे सुरजचं घर बांधून तयार होत आहे. तर दुसरीकडे त्याचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9 / 9
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात सूरज चव्हाण एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
टॅग्स :अजित पवारबारामतीमराठी अभिनेताटेलिव्हिजनसुंदर गृहनियोजन