अमृता फडणवीसांच्या फॅशनची बातच न्यारी! मिसेस उपमुख्यमंत्र्यांचा डेनिम लूक चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:02 PM1 / 8उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 2 / 8अमृता अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री वेडिंगलाही त्यांनी हजेरी लावली होती. 3 / 8पेशाने बँकर असलेल्या अमृता यांना गाण्याची आवड आहे. पण, त्यांच्या गाण्यांबरोबरच मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या फॅशनचीही चर्चा असते. 4 / 8अमृता अनेकदा त्यांच्या हटके लूकमधील फोटो शेअर करताना दिसतात. आता त्यांनी डेनिम लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.5 / 8या फोटोमध्ये त्यांनी जीन्स आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केल्याचं दिसत आहे. 6 / 8त्यांचा हटके लूक चर्चेत आला आहे. या लूकमधील त्यांच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. 7 / 8अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे आणि वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतात. 8 / 8सोशल मीडियावर त्या अगदी परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications