By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 18:32 IST
1 / 10उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थिती दर्शवतात. नुकत्याच एका मंगळागौर कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती. 2 / 10वर्सौवा येथे झालेल्या एका मंगळागौर कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी उपस्थिती दर्शविली. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून अमृता यांनी पारंपरिक लूक केला होता. केसाचा खोपा करुन त्यांनी डोक्याच गुलाबाची फुलं माळली होती. 3 / 10हातात हिरव्या बांगड्या, पाटल्या तर गळ्यात पारंपरिक दागिने घालत अमृता फडणवीसांनी लक्षवेधी लूक केला होता. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि कमरपट्टा घालून अमृता अगदी मराठमोळ्या पद्धतीने नटल्या होत्या. 4 / 10पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या मंगळसूत्राने. अमृता यांनी गळ्यात अगदी पारंपरिक पद्धतीचं मंगळसूत्र घातलं होतं. त्यांच्या या मंगळसूत्राने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 5 / 10मंगळागौरीच्या कार्यक्रमातील काही फोटो अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता यांचा वेगळाच थाट पाहायला मिळत आहे. 6 / 10'या उत्सवामध्ये ३ हजाराहून अधिक सहभागी झालेल्या महिलांसोबत मराठमोळी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे खेळ खेळले, फुगडी खेळली, उखाणा घेतला. अनेक महिलांसोबत सेल्फी काढली. महिलांशी भरभरून गप्पा मारल्या. यावेळी मन प्रफुल्लित झाले आणि भारतीय पारंपरिक सणाची मजाही अनुभवली,' असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. 7 / 10 अमृता यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. त्यांचा नऊवारी साडीतील हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 8 / 10अमृता या पेशाने बँकर आहेत. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक मुद्द्यांवरही त्या ट्वीटमधून अगदी परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात. 9 / 10अमृता यांना गाण्याचीही विशेष आवड आहे. त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'शिवतांडव स्त्रोतम, कुणी म्हणाले, मूड बनालिया, वो तेरे प्यार का गम ही अमृता यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली होती. 10 / 10अमृता या अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळेही चर्चेत असतात. त्यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३५ पुरणपोळ्या खातात, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. (सर्व फोटो : अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)