Devdas Turns 19: पारोसाठी 600 साड्या, चंद्रमुखीसाठी महागडा सेट..., वाचा ‘देवदास’चे किस्से By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 4:21 PM1 / 10शाहरूख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा प्रत्येक सीन इतका परफेक्ट होता की, पाहतांना डोळे दिपतात. भन्साळींनी प्रत्येक सीन परफेक्ट बनवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली होती. इतकेच नाही तर या सिनेमावर पाण्यासारखा पैसाही खर्च केला होता.2 / 10‘देवदास’ हा 2002 पर्यंत रिलीज झालेल्या सर्व सिनेमांपेक्षा सर्वाधिक महागडा सिनेमा होता. 50 कोटींचा बजेट असलेला हा सिनेमा भरत शाह यांनी प्रोड्यूस केला होता.3 / 10‘देवदास’चे भव्यदिव्य सेट एकूणच खास होते. हे सेट तयार करण्यासाठी शेकडो मजूर 7 ते 9 महिने रात्रंदिवस खपले होते. हे सेट बनवण्यासाठी 20 कोटी रूपये खर्च झाले होते. विशेष म्हणजे, चंद्रमुखीचा ‘कोठा’ तयार करण्यावर सर्वाधिक 12 कोटी रूपयांचा खर्च झाला होता. 4 / 10पारोच्या घराचा सेट स्टँड ग्लासच्या मदतीने तयार झाला होता. शूटींग सुरू असताना पाऊस सुरू होता. त्यामुळे या ग्लासला सतत पेंट करावे लागत होते. हे घर उभारण्यासाठी 1.2 लाख स्टँड ग्लासचा वापर करण्यात आला होता.5 / 10आश्चर्य वाटेल पण या सिनेमाच्या सेटवर 42 जनरेटरचा वापर झाला होता. सिनेमात वेगवेगळ्या लाईट्सचा वापर झाला होता. सिनेमेटोग्राफर विनोद प्रधान यांनी 2500 लाईट्स वापरले होते आणि यासाठी 700 लाईटमॅन सेटवर तैनात होते.6 / 10माधुरी दीक्षितच्या प्रत्येक आऊटफिटची किंमत जवळपास 15 लाख रूपये होती. अबू जानी संदीप खोसला यांनी तिचे हे ड्रेस डिझाईन केले होते.7 / 10 काहे छेड छेड मोहे या गाण्यात माधुरीने घातलेला लेहंगा 30 किलो वजनाचा होता. पण तो घालून तिला डान्स जमेना. मग आणखी एक 16 किलो वजनाचा लेहंगा तयार केला गेला होता.8 / 10ऐश्वर्या राय या सिनेमात एकापेक्षा एक सुंंदर साड्या तुम्ही पाहिल्या असतीलच. संजय लीला भन्साळींनी कोलकात्यातून तिच्यासाठी खास 600 साड्या खरेदी केल्या होत्या. या साड्या एकमेकांसोबत पॅच करून एक वेगळा लुक तयार करण्यात आला होता.9 / 10नॉर्मल साछी 6 मीटरची असते. पण पारोची प्रत्येक साडी 8-9 मीटरची होती. तिचा प्रत्येक लुक तयार करण्यासाठी नीतू लुल्ला यांना 3 तासांपेक्षा अधिक वेळ लागायचा.10 / 10इस्माइल दरबारने या सिनेमाला म्युझिक दिले होते. यासाठी त्यांनी 2 वर्ष लागली होती. प्रत्येक गाण्याचे रेकॉर्डिंग 10 दिवस व्हायचे यानंतर त्याला 8-9 वेळी मिक्स केले जायचे. यादरम्यान इम्साइल दरबार व संजय लीला भन्साळींचे मतभेद झाल्याच्या चर्चाही तेव्हा होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications