‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!! By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:35 PM1 / 9बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म, राज, अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. पण या सिनेमांपेक्षाही बिपाशा चर्चेत राहिली ती तिच्या पर्सनल लाईफमुळे.2 / 9सगळ्यांनाच ठाऊक आहे की, बिपाशा एकेकाळी जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जिस्मच्या शूटींगदरम्यान जॉन व बिप्स एकमेकांच्या प्रेमात पडले होते.3 / 9डिनोनंतर बिपाशाच्या आयुष्यात जॉन अब्राहमची एन्ट्री झाली होती. जिस्मच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती आणि पुढे प्रेम झाले.4 / 9 दहा वषार्तील या दोघांचे बॉन्डिंग बघता, हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असे मानले जात होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. या लव्हस्टोरीला 10 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. पण का?5 / 9चर्चा खरी मानाल तर या ब्रेकअपसाठी एक घटना कारणीभूत ठरली होती. होय, या घटनेनंतर जॉन व बिप्स काही वर्षे सोबत राहिले. पण यादरम्यान दोघांमध्ये मतभेदाची भींत पडली होती.6 / 9आता ही घटना काय होती तर 2007 मध्ये बिप्स आणि सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. एका इव्हेंटमध्ये बिप्स व रोनाल्डोने रात्री उशीरापर्यंत पार्टी केली होते आणि यादरम्यान रोनाल्डो बिप्सला किस करताना दिसला होता.7 / 9अर्थात ही घटना खरी की खोटी याचा कधीच अधिकृतपणे खुलासा झाला नाही. पण या घटनेने बिप्स व जॉनमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे मानले जाते.8 / 9अखेर जॉन व बिप्सचे ब्रेकअप झाले. पुढे बिप्सने करण सिंग ग्रोव्हरला जोडीदार म्हणून निवडले तर जॉनने प्रिया रूंचाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.9 / 9हर्मन बावेजानंतर बिपाशाच्या आयुष्यात करणसिंग ग्रोव्हरची एन्ट्री झाली. ‘अलोन’च्या सेटवर बिपाशा व करण एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर करण विवाहित होता. त्याची दोन लग्ने झाली होती. पण यामुळे बोल्ड बिपाशाला काहीच फरक पडला नाही. बिपाशाने करणची तिसरी पत्नी होणे आनंदाने स्वीकारले. आणखी वाचा Subscribe to Notifications