'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत गुरुची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्याने लिहिली तिच्यासाठी खास पोस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 4:56 PM1 / 9सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेता अभिजीत गुरुची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.2 / 9अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे अभिजीत गुरु आणि त्याच्या पत्नीची.3 / 9'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत गुरु. मालिकेमध्ये KD ही भूमिका साकारून अभिजीतने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. परंतु, केडी अभिनेता असण्यासोबतच उत्तम पटकथालेखक आणि संवादलेखक देखील आहे. 4 / 9अनेक मालिका, चित्रपट यांच्यासाठी पटकथा लिहिणाऱ्या अभिजीतची पत्नीदेखील कलाविश्वात सक्रीय असून ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.5 / 9अभिजीतच्या पत्नीचं नाव समिधा गुरु असं असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने एक खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.6 / 9समिधा आणि अभिजीत शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे प्रथम या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.7 / 9विशेष म्हणजे समिधा किंवा अभिजीत यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही. मात्र, एकमेकांना त्यांच्या मनातील भावना समजल्या आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.8 / 9अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.9 / 9समिधा 'लवंगी मिरची' मालिकेत दिसली होती. तर सध्या ती 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत दिसत आहे. त्यांना दुर्वा ही एकुलती एक मुलगी आहेय. आणखी वाचा Subscribe to Notifications