एक हजारों में मेरी बहना है! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणींच्या जोड्या, जाणून घ्या कोण आहेत By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 7:00 AM1 / 5मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत. आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रींच्या सख्या बहिणी फारशा ठाऊक नसतील. म्हणून या सेलि्ब्रिटी बहिणींविषयी आपण जाणून घेणार आहोत.2 / 5वागळे कि दुनिया या मालिकेत भारती आचरेकर राजेश वागळेच्या आईची भूमिका साकारताना दिसतायेत. भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या दोघीही सख्या बहिणी आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघेही नेहमी एकत्र दिसतात. मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वातसुध्दा या दोघी बहिणी आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. (Photo Instagram)3 / 5'मन उडू उडू' मालिकेत इंद्राची आईची भूमिका अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर साकारली होती . पण तुम्हाला माहिती आहे का पूर्णिमा तळवळकर यांची सखी बहीणसुद्धा अभिनेत्री आहे. अभिनेत्री पल्लवी वैद्य पूर्णिमा तळवळकर यांची सखी बहीण आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पल्लवीने साकारलेली पुतळा राणीसाहेबांची भूमिका लक्षवेधी ठरली.(Photo Instagram)4 / 5भार्गवी आणि चैत्राली ही सिनेविश्वातली सख्या बहिणींची जोडी आहे. भार्गवीने मोलकरीणबाई, वहिनीसाहेब अशा मालिकांमधून तर संदूक, वन रुम किचन अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं . भार्गवी एक कुशल नृत्यांगना सुध्दा आहे. तिने सेलिब्रिटी नृत्याच्या रिएलिटी शोचं विजेतेपदही पटकावलंय. तर तिची बहिण चैत्राली सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. (Photo Instagram5 / 5छोट्या पडद्यावरच्या या तावडे सिस्टर्स सोशल मिडीयावर सुध्दा नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तितिक्षाने सरस्वती, तू अशी जवळी रहा या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलीये. तर खुशबूची आम्ही दोघी मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली. या दोघींनीही हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेतलं आहे... (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications