'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:19 PM1 / 10नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट २०१६ साली रिलीज झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत १०० कोटींहून जास्तचा गल्ला जमविला. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने (Suresh Vishwakarma) साकारली. 2 / 10सुरेश विश्वकर्माला सैराट चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. पाटलाच्या भूमिकेतून ते घराघरात पोहचले.3 / 10सुरेश विश्वकर्मा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच त्याचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.4 / 10सुरेश विश्वकर्माच्या पत्नीचे नाव विद्या असून तिने दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थ डे. माझ्या हृदयातला राजा. 5 / 10सुरेश विश्वकर्माची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. 6 / 10सुरेश विश्वकर्माची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे.7 / 10सुरेश विश्वकर्माने लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. 8 / 10या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे. 9 / 10सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय राजा राणी, अल्याड पल्याड, रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत.10 / 10काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या धर्मवीर २मध्येही सुरेश विश्वकर्माने काम केले आहे. आमदार संजय शिरसाट यांची भूमिका साकारली. आणखी वाचा Subscribe to Notifications