Join us

Ram Gopal Varma: 'मी तिच्याकडून हे शिकलो'; व्हायरल व्हिडिओवर राम गोपाल वर्मांनी दिली विचित्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:13 IST

1 / 6
एकेकाळी बॉलीवूडचे अव्वल दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा आता फक्त तेलुगू सिनेमांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. तसेच राम गोपाल वर्मा अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादाचा भाग देखील बनले आहेत.
2 / 6
अलीकडेच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. व्हिडीओमधील त्यांच्या कृत्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले होते.
3 / 6
तेलगू अभिनेत्री आशु रेड्डी हिची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागत होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्री आशु रेड्डीच्या पायाची मसाज करत असल्याचे दिसले. राम गोपाल वर्मांच्या या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसेच राम गोपाल वर्मा यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले.
4 / 6
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्री आशु रेड्डीच्या पायाची मसाज करत असल्याचे दिसत आहे. राम गोपाल वर्मा अभिनेत्रीसमोर जमिनीवर बसले आहेत. तर समोरच्या सोफ्यावर आशु रेड्डी बसलेली होती. यावेळी मसाज करत असताना राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्रीच्या वायाचा चावा घेतलाय. हाच फोटो आणि व्हिडीओ त्यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु, हे सर्व अभिनेत्रीच्या परवानगीनेच झाल्याचे समोर आले होते. आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी राम गोपाल वर्मा यांनी सदर कृत्य केल्याचेही समोर आले होते.
5 / 6
सदर व्हिडिओवर आता राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशू रेड्डीच्या पायाजवळ मला जाणवलेली डेंजरस भावना. ते मी अप्सरा राणीच्या कुत्र्याकडून शिकलो, असं राम गोपाल वर्मा म्हणाले. इतकंच नाहीतर, अप्सरा राणीच्या कुत्र्याच्या इन्स्टा हँडलची लिंकही शेअर केली आहे. हे ट्विट करून राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा नेटिझन्सच्या निशाण्यावर आले आहेत.
6 / 6
सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांना जाणून घ्यायचे आहे की कोण आहे हा आशु रेड्डी?, अशी चर्चा सुरु झाली होती. अभिनेत्री असण्यासोबतच आशु एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील आहे. आशु रेड्डीने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. आशु रेड्डीने 2018 साली 'चल मोहन रंगा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2019 मध्ये, आशु बिग बॉस तेलुगु सीझन 3च्या स्पर्धकांपैकी एक होती. हा रिअ‍ॅलिटी शो नागार्जुनने होस्ट केला होता.
टॅग्स :राम गोपाल वर्मासामाजिक