Disha Patani Birthday Special: दिशा पटानीचा हा बीच लूक पाहून म्हणाल कडक By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 6:30 PM1 / 9'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. दिशाने खूप कमी वर्षांत खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळवले आहे.2 / 9दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.3 / 9धोनी या चित्रपटातील दिशाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं.4 / 9'बागी-२' या सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना प्रचंड भावली होती.5 / 9दिशा नुकतीच मलंग या चित्रपटात झळकली होती. आता ती सलमानच्या राधे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.6 / 9दिशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे बिकनीतील अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.7 / 9दिशा तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबत तिचे अफेअर असल्याची चर्चा नेहमीच मीडियात ऐकायला मिळते.8 / 9दिशा आणि टायगरच्या अफेअरची चर्चा होत असली तरी ते दोघे केवळ फ्रेंड्स असल्याचे ते आवर्जून सांगतात.9 / 9दिशाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications