लग्नानंतर ८ वर्षांनी झाला घटस्फोट, आता बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करतेय 'ही' टीव्ही अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 6:00 PM1 / 9बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही क्षेत्रातही अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचं अनेक वर्षांनी नातं तुटलं आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही वाईट वाटलं आहे. आशा नेगी-ऋत्विक धनजानी, रिद्धी डोगरा-राकेश बापट, अंकिता-सुशांत या त्यापैकीच प्रेक्षकांच्या काही आवडत्या जोड्या आहेत.2 / 9टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा (Riddhi Dogra) सध्या छोट्या पडद्यापासून लांब गेली असून बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की रिद्धी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भाची आहे. 3 / 9रिद्धीने 2007 साली 'झूमे जिया रे' मधून अभिनयात पदार्पण केलं. यानंतर तिने 'राधा की बेटिया कर दिखाएंगी','लागी तुझसे लगन' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.4 / 9 पण तिला खरी ओळख मिळाली ती 2010 साली आलेल्या 'मर्यादा' मालिकेतून. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली होती.5 / 9'मर्यादा'च्या सेटवरच रिद्धीची राकेश बापटशी ओळख झाली. एका इंटिमेट सीनवर हसताना त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. हळहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. 'नच बलिए 6' मध्ये दोघांनी सहभाग घेतला. 6 / 9अचानक दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 सालीच ते लग्नबंधनात अडकले. 'मेड फॉर इच अदर' असं त्यांच्याबद्दल बोललं जायचं. रिद्धी मुलाखतीत म्हणाली होती की,'आम्हाला एकमेकांची फार सवय झाली होती. कुटुंबानेही आम्हाला मोकळीक दिली होती. या फ्लोमध्येच आमचं लग्न झालं.'7 / 9मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी 2019 साली त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. ८ वर्ष एकमेकांसोबत राहून त्यांना कळलं की आपण आयुष्यभर सोबत राहू शकणार नाही. म्हणून त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 8 / 9दोघंही नंतर आपापल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये पुढे गेले. रिद्धीने नुकतंच शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात काम केलं. याशिवाय 'टायगर 3' मध्येही ती दिसली. 'असुर' या लोकप्रिय सीरिजमधूनही ती प्रसिद्धीझोतात आली. 9 / 9रिद्धी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. चाहत्यांना ती अपडेट्स देत असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवर चाहते फिदा आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications