जिनिलियासोबत भांडणं होतात का?, रितेश देशमुखच्या 'त्या' उत्तरानं जिंकली महाराष्ट्राची मनं By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 7:00 AM1 / 12रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या वेड चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४व्या दिवसापर्यंत ४०.१७ कोटींचा गल्ला जमवला आहे.2 / 12जिनिलिया आणि रितेशच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली तर या दोघांना भेटून नुकतीच २० वर्षे पूर्ण झालेली पाहायला मिळाली. त्यांच्या या २० वर्षांच्या प्रवासातील अनेक गोड आठवणी या दोघांनी नेहमीच मीडियासमोर शेअर केल्या आहेत. 3 / 12वीस वर्षांपूर्वी रामोजी फिल्म सिटी येथे रितेश आणि जेनेलियाची पहिल्यांदा भेट झाली. मात्र या भेटीतही एक ट्विस्ट होता. 4 / 12चित्रपटाच्या निमित्ताने रितेश फ्लाईटने रामोजी फिल्मसिटीला रवाना झाला त्याच फ्लाईटमध्ये चित्रपटाची नायिका सुद्धा असणार हे त्याला सांगितले होते.5 / 12फिल्मसिटीमध्ये रितेश आणि जिनिलियाची ओळख करून देण्यात आली. रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे हे जिनिलिया जाणून होती त्यामुळे तो खूप एटीट्युड दाखवेल असे तिला वाटले मात्र पहिल्या भेटीत त्याचा साधेपणा पाहून जिनिलियाने देखील त्याच्याशी मैत्री केली. 6 / 12ही होती त्यांची पहिली ओळख मात्र यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले मात्र यादरम्यान दोघांनी कधीच एकमेकांना प्रॉपर प्रपोज केलेले नव्हते. 7 / 12तुमच्यात कधी भांडणं होतात का? आणि सॉरी कोण म्हणतं? असा प्रश्न कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांना विचारण्यात आला होता.8 / 12तेव्हा जिनिलिया म्हणाली की, ‘हो मी रितेश सोबत भांडण करते मात्र तो कधीच त्या गोष्टीवर रिअॅक्ट होत नाही. मी त्याला काहीही बोलले की तो फक्त ऐकून घेतो आणि निघून जातो. पुन्हा सकाळी येऊन गुड मॉर्निंग म्हणतो’. 9 / 12जिनिलियाच्या या उत्तरावर रितेश म्हणतो की, जेव्हाही आमच्यात भांडणं होतात तेव्हा मीच स्वतःहुन बोलण्याचा प्रयत्न करतो. कालची गोष्ट काल संपली आजचा दिवस नवीन आहे आणि तो नव्याने साजरा केला पाहिजे त्यामुळे माझं नाव तर रितेश देशमुखच्या जागी सॉरी देशमुख असायला हवं.10 / 12खरं तर ही भांडणं होऊ नयेत म्हणून रितेशने स्वतःला आणि जेनेलियाला सुद्धा एक नियम घालून दिलेला आहे की तो दिवसभरात जेनेलियाने विचारलेल्या केवळ १० प्रश्नांचीच उत्तरं देणार. यामुळे आमच्यात भांडणं फारशी होत नाहीत असे हे दोघे सांगतात. 11 / 12तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.12 / 12रितेश आणि जिनिलियाला रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications