Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का? समीर,गौरवची फी ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 5:38 PM

1 / 9
छोट्या पडद्यावर गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. कायम चर्चेत येणाऱ्या या कलाकारांचं सध्या मानधन चर्चेत आलं आहे.
2 / 9
मीडिया रिपोर्ट्नुसार, मुंबईची चुलबूली गर्ल शिवाली परब एका भागासाठी ३५ ते ३७ हजार रुपये मानधन घेते.
3 / 9
कलाविश्वासह सोशल मीडियावर सक्रीय असलेली रसिका वेंगुर्लेकर एका एपिसोडसाठी २५ ते ३० हजार रुपये घेते.
4 / 9
वनिता खरात हे नाव कोणालाही नवीन नाही. मराठीसह बॉलिवूडमध्ये झळकलेली वनिता एका एपिसोडसाठी ३२ ते ३५ हजार रुपये घेते.
5 / 9
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव एका भागासाठी ३० ते ३७ हजार रुपये घेते.
6 / 9
सगळ्यांचा लाडका दादूस म्हणजेच अभिनेता अरुण कदम एका एपिसोडसाठी ३० ते ३५ हजार रुपये मानधन घेतात.
7 / 9
अभिनेता प्रसाद खांडेकर सगळ्यांपेक्षा थोडं मानधन घेतात. ते एका भागासाठी ४० ते ५० हजार रुपये मानधन घेतात.
8 / 9
समीर चौगुले यांनी तर प्रेक्षकांना पार वेड लावलं आहे. उत्तम विनोदवीर, लेखक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा समीर एका भागासाठी ४० ते ५० हजार रुपये घेतात.
9 / 9
फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थात गौरव मोरे सुद्धा एका भागासाठी ४० ते ५० हजार रुपये घेतो.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटीटेलिव्हिजनसमीर चौगुले