Join us

राज कुंद्रा मास्कच्या मागे चेहरा का लपवतो माहितीये? अखेर खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 5:33 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, उद्योजक राज कुंद्रा याचं पॉर्नोग्राफी प्रकरण चांगलंच गाजलं.
2 / 8
या प्रकरणी राज कुंद्राला तुरुंगातही जावं लागलं असून तुरुंगातून सुटल्यानंतर बराच काळ तो प्रसारमाध्यमांसमोर आला नाही.
3 / 8
सध्या राज कुंद्रा त्याच्या चित्रविचित्र मास्कमुळे चर्चेत येत आहे. जेव्हापासून राजचं पॉर्नोग्राफी प्रकरण उघड झालं तेव्हापासून तो मास्क वापरु लागला आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे.
4 / 8
राज नेमकं कशामुळे मास्क वापरतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, काहींनी या मास्क वापरण्याचा संबंध पॉर्नेग्राफी प्रकरणाशीही जोडला आहे.
5 / 8
मध्यंतरी राजने सोशल मीडियावर एक सेशन घेतलं. यात त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलं. ही उत्तर देत असताना त्याने मास्क वापरण्यामागचं कारणही सांगितलं.
6 / 8
‘तुझा चेहरा सर्वांसमोर आण आणि सत्याला सामोरं जा. तू जर काही चांगलं किंवा वाईट केलं असशील तर त्याची जबाबदारी घेण्याची हिंमत ठेव. लोक तू आहेस तसं तुझा स्वीकार करतील’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती. त्यावर उत्तर देत त्याने मास्क वापरण्यामागचं कारण सांगितलं.
7 / 8
'मी लोकांपासून माझा चेहरा लपवत नाही. पण, मीडियाने माझे फोटो, व्हिडीओ काढू नयेत एवढीच माझी इच्छा आहे. मी ज्या मीडिया ट्रायलमधून गेलोय त्यानंतर ही गोष्ट समजायला तुम्हाला फार कठीण जाणार नाही, असं राज म्हणाला.
8 / 8
राजला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. जवळपास २ महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. इतकंच नाही तर जामीन मिळाल्यानंतर वर्ष पूर्ण झाल्यावर त्याने सीबीआयला पत्र लिहून न्याय मागितला आहे. मी निर्दोष असून मला अडकवलं जात असल्याचं त्याने म्हटलं आहे.
टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटी