Join us

आठवतेय का 'राम तेरी गंगा मैली'मधली मंदाकिनी? आता दिसते अशी, लवकरच करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 4:51 PM

1 / 9
राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या सिनेमातील धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.
2 / 9
पण मंदाकिनी कुठे आहे? आता कशी दिसतेस? तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील ना. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
3 / 9
अभिनेत्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती. आता मंदाकिनीला ओळखणं खूप कठीण झाले आहे.
4 / 9
अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा आपल्या मनमोहक स्टाईलने लोकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.
5 / 9
मंदाकिनी तिच्या 'मा ओ मा' या म्युझिक व्हिडीओद्वारे सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. या गाण्याचे पहिले पोस्टरही आज रिलीज करण्यात आले आहे.
6 / 9
मंदाकिनी आजही तिच्या लोकप्रिय चित्रपट राम तेरी गंगा मैलीसाठी ओळखली जाते. मंदाकिनीने या चित्रपटात इतकं उत्तम काम केलं की आजपर्यंत लोक तिची आठवण काढतात.
7 / 9
आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या माँ ओ मा या म्युझिक व्हिडिओद्वारे शोबिझ जगतात प्रवेश करणार आहे.
8 / 9
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या गाण्याचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या गाण्यात मंदाकिनीसोबत तिचा मुलगा रबिल ठाकूरही दिसणार आहे.
9 / 9
माँ ओ मा या गाण्याचे दिग्दर्शन साजन अग्रवाल यांनी केले आहे. या गाण्याचे बोल त्यांनी लिहिले आहेत. या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :मंदाकिनी