'गदर'मधला हा बालकलाकार आठवतोय का?, आता दिसतो खूप हॅण्डसम, पाहा त्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 2:31 PM1 / 9बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा गदर २ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 2 / 9२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाचे खरे तर सगळेच चाहते आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात एक खास स्थान आहे. 3 / 9त्यातील एक पात्र म्हणजे 'जीते'ची भूमिका, जो सनी देओल आणि अमिषा पटेलचा मुलगा होता. ही भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शर्मा २००१ मध्ये केवळ ७ वर्षांचा होता, परंतु तरीही त्याने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. पण आज तो पूर्णपणे बदलला आहे.4 / 9जीते म्हणजेच उत्कर्ष शर्मा आता २८ वर्षांचा आहे. त्याचवेळी, या २२ वर्षांत उत्कर्षचा संपूर्ण लूकच बदलला आहे. तो आता गोंडस राहिला नसून अत्यंत देखणा झाला आहे. 5 / 9 ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या गदर २ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलसोबत तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 6 / 9उत्कर्षचे इंस्टाग्रामवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यांच्यासाठी अभिनेता त्याचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.7 / 9'गदर' चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेता उत्कर्ष 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो'मध्ये बालकलाकार म्हणून काम करताना दिसला होता.8 / 9 २०१८ मध्ये तो जिनियस या चित्रपटाचा भाग बनला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. 9 / 9उत्कर्ष शर्मा गदर २ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications