डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
By देवेंद्र जाधव | Updated: February 19, 2025 11:30 IST
1 / 7डॉ. अमोल कोल्हे यांना 'राजा शिवछत्रपती' मालिकेत साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतरही अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली.2 / 7अक्षय कुमार आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षयचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.3 / 7'तान्हाजी' सिनेमातील शरद केळकरचा पहिला लूक जेव्हा समोर आला तेव्हाच चाहत्यांना आणि शिवप्रेमींना हा लूक चांगलाच आवडला. शरद केळकरने साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका चांगलीच गाजली.4 / 7दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टक सिनेमातील आजवरच्या सर्व सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली5 / 7'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अभिनेता शंतनु मोघेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ही भूमिकाही चाहत्यांच्या पसंतीस उतरली.6 / 7भालजी पेंढारकर दिग्दर्शित 'छत्रपती शिवाजी' या सिनेमात अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. मराठी सिनेसृष्टीत चंद्रकांत मांढरे यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.7 / 7'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमात महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.