Join us

या' 8 अभिनेत्रींनी लग्नात कपड्यांवर खर्च केले लाखो रुपये; ऐश्वर्याच्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 4:28 PM

1 / 9
बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंसाठी ओळखले जातात. अलिकडेच अभिनेत्री पत्रलेखाने राजकुमार रावसोबत लग्नगाठ बांधली आहे. या सोहळ्यात पत्रलेखाने परिधान केलेला लेहंगा सर्वाधिक चर्चेत आला. हा लेहंगा प्रचंड महाग असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच लग्नात महागडे कपडे परिधान करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.
2 / 9
पत्रलेखा - १५ नोव्हेंबर रोजी पत्रलेखाने चंदीगढमधील द ओबेरॉय सुखविलास स्पा रिजॉर्टमध्ये राजकुमार रावसोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नात तिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी तिचा लेहंगा डिझाइन केला असून त्याची किंमत लाखांच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं.
3 / 9
जनेलिया डिसुझा - महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनेलियाने देखील लग्नात प्रचंड महाग साडी नेसली होती. जवळपास १७ लाख रुपयांची ही साडी असल्याचं म्हटलं जातं.
4 / 9
बिपाशा बासू - अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत बिपाशाने लग्न केलं असून ही जोडी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. बिपाशाने तिच्या लग्नात रेड-गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. याची किंमत ४ लाख रुपये होती.
5 / 9
अनुष्का शर्मा - अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा लग्नसोहळा विशेष गाजला होता. या दोघांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नात अनुष्काने हलक्या गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. विशेष म्हणजे तिच्या लेहंग्याची चाहत्यांमध्ये खास चर्चा रंगली होती. हा लेहंगा ३० लाखांचा होता.
6 / 9
करीना कपूर - करीना कपूर-खानने तिच्या लग्नात तिच्या सासूबाईंचा पारंपरिक लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्याला थोडा मॉर्डन टच देण्यात आला होता. हा लेहंगा ५० लाखांचा असल्याचं म्हटलं जातं.
7 / 9
दीपिका पदुकोण - दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे तिचा लग्नातील प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये चर्चिला गेला होता. अगदी सप्तपदीपासून ते रिसेप्शनपर्यंत तिच्या कपड्यांची चर्चा झाली. यात सप्तपदीच्या वेळी दीपिकाने परिधान केलेला लेहंगा १२ लाखांचा होता.
8 / 9
शिल्पा शेट्टी - गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रामुळे चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज जामीनावर बाहेर आहे. परंतु, पत्रलेखाच्या लग्नानंतर सेलिब्रिटींची लाईफस्टाइल चर्चेत आली आहे. यात शिल्पाचही नाव घेतलं जातं. शिल्पाने तिच्या लग्नात तब्बल ५० लाखांची साडी नेसली होती.
9 / 9
ऐश्वर्या राय - बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्याने लग्नात परिधान केलेली साडी सर्वात महागडी असल्याचं सांगण्यात येतं. बच्चन कुटुंबाच्या या सुनेने लग्नात तब्बल ७५ लाखांची साडी नेसली होती.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडअनुष्का शर्माबिपाशा बासूशिल्पा शेट्टीऐश्वर्या राय बच्चनदीपिका पादुकोण