Join us

'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघ आहे 'या' आजाराने त्रस्त; पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 5:36 PM

1 / 8
मराठीसह हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. अलिकडेच स्नेहा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडली.
2 / 8
बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झालेली स्नेहा वाघ या घरात विविध कारणांमुळे चर्चेत राहिली.
3 / 8
प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्नेहा सध्या एका त्वचेसंबंधित आजाराने त्रस्त झाली आहे.
4 / 8
स्नेहाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या स्किनशी संबंधित आजाराविषयी माहिती दिली.
5 / 8
स्नेहाच्या चेहऱ्यावर लहानशी दुखापत झाली असून त्यामुळे तिला फेशिअल हेमाटोमा झाल्याचं तिने सांगितलं आहे.
6 / 8
तसंच 'काळजी करु नका.. मी लवकरच बरी होईन', असंही आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.
7 / 8
स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
8 / 8
स्नेहा वाघ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी ३ या शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.
टॅग्स :स्रेहा वाघसेलिब्रिटीबिग बॉस मराठी