ना सप्तपदी घेणार, ना कबूल है म्हणणार, फरहान अख्तर-शिबानी दांडेकर हटके पद्धतीने लग्न करणार By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:45 PM1 / 8बॉलिवूडमध्ये अनेक अशी जोडपी आहेत ज्यांच्या विवाहाची खूप चर्चा झाली. आता बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे आता विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी हळदी समारंभाने विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हा विवाह मराठी रीती-रिवाजाने होईल, अशी चर्चा होती. मात्र आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. 2 / 8फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे खंडाळा येथील आलिशान फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 3 / 8फरहान आणि शिबानी यांनी विवाह जरा हटके पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. हा विवाह सोहळा लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील, अशी त्यांची अपेक्षा आहे. 4 / 8प्रसारमाध्यमातील रिपोर्टनुसार दोघांनीही सप्तपदी घेऊन किंवा तीन वेळा शाही कबूल है, कबूल है, कबूल है म्हणून विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही अगदी खास पद्धतीने विवाह करणार आहेत. 5 / 8मिळत असलेल्या माहितीनुसार दोघांनीही आपल्या विवाहाला एक इंटिमेट Vow सेरेमनी बनवले आहे. दोघांनीही आपली Vows (वचने) लिहिली आहेत. तसेच १९ फेब्रुवारी रोजी विवाहाच्या दिवशी दोघेही ही वचने एकमेकांसमोर आणि नातेवाईकांसमोर वाचणार आहेत. 6 / 8शिबानी आणि फरहान यांना ओळखणाऱ्या व्यक्तींना दोघांचेही प्रेम धार्मिक परंपरांपेक्षा वरचे असल्याची माहिती आहे. त्यामुळेच या दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.7 / 8१९ फेब्रुवारी होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी फरहानच्या खंडाळा येथील फार्महाऊसला सजवण्यात आले आहे. तसेच फार्महाऊसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा फुले आणि लाईट्सनी सजवण्यात आले आहे. अगदी खासगीपणे हा विवाह सोहळा होत असल्याने त्यामध्ये केवळ ५० जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. 8 / 8१९ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर फरहान आणि शिबानी २१ फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज करतील. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीमधून याबाबतची माहिती दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications