Father’s Day 2022: बाबा...!! मराठी अभिनेत्रींनी शेअर केलेत बाबासोबतचे खास फोटो, तुम्ही पाहिलेत? By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 5:45 PM1 / 7 मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फादर्स डे निमित्त पोस्ट शेअर केली आहे. बाबानं खूप प्रेम, आधार आणि स्थैर्य दिलं..., असं तिने म्हटलं आहे.2 / 7अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं बाबासोबतचा एक गोड फोटो शेअर करत, हॅपी फादर्स डे, असं लिहिलं आहे.3 / 7अमृता खानविलकर हिनेही बाबाचा फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.4 / 7अपूर्वा नेमळेकर हिनं बालपणीचा बाबासोबतचा फोटो शेअर केला आहे. मी तुमच्यासाठी कायम अशीच लहान मुलगी म्हणून राहणार. बाबा तुमची खूप आठवण येते,असं अपूर्वाने लिहिलं आहे.5 / 7अभिनेत्री रूपाली भोसले हिने देखील वाडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या आयुष्यात प्रकाशवाट निर्माण करणारा बाबा असतो...असं तिने म्हटलं आहे.6 / 7 अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने बाबासोबतचा एक हसरा फोटो शेअर केला आहे. बाबानं नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यात मला मदत केली..., असं तिने म्हटलं आहे.7 / 7भार्गवी चिरमुले हिने आपल्या रियल आणि रील आयुष्यातील वडिलांचे फोटो शेअर करत दोघांचेही आभार मानले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही जागा केला असं तिने म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications