Join us

‘या’ मराठी अभिनेत्याच्या मुलीचा बॉडीबिल्डिंग क्षेत्रात डंका; जागतिक स्तरावर मिळवलंय कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 12:02 PM

1 / 11
एखाद्या अभिनेत्याचा मुलगा किंवा मुलगी त्याच क्षेत्रात उतरल्याचं अनेकदा ऐकलं असेल. मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने नावलौकिक झालेले अभिनेते नागेश भोसले यांचा अलीकडेच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
2 / 11
केवळ मराठीतच नाही तर अनेक हिंदी सिनेमांमध्येही अभिनेते नागेश भोसले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. देवयानी या मालिकेतील नागेश भोसले यांनी आबासाहेबांची साकारलेली भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
3 / 11
मात्र आज आम्ही तुम्हाला नागेश भोसले यांच्या कन्येबद्दल सांगणार आहोत. जिच्याबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे. कलाकारांची मुले कलाक्षेत्रातच येतात असा समज आहे परंतु नागेश भोसले यांची कन्या कुहूने अभिनेय क्षेत्र सोडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
4 / 11
कुहू भोसले हीनं फिटनेस क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप कमी दिसतो अशा बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कुहूने तिचं कतृत्व सिद्ध केले आहे. कुहू भोसले अँथलेट, वुमन्स बॉडीबिल्डर आहे. वयाच्या १७ व्या वर्षी कुहूनं या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.
5 / 11
नागेश भोसले हे खुल्या विचारांचे व्यक्तिमत्व आहे. आधुनिक काळात पारंपारिक विचारसरणीला फाटा देत जगाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून ते पाहतात. कुहूने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर वडील म्हणून नागेश भोसलेंनी तिला भक्कम पाठिंबा दिला.
6 / 11
आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडायचा अधिकार असतो. भारतात महिलांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्र निवडणं हे फार कमीच आहे. परंतु हा एक खेळ आहे. जागतिक पातळीवर अनेक महिला क्रिडा स्पर्धेत नावं कमवत असतात. त्यामुळे मुलीने घेतलेल्या निर्णयानं मला आनंदच झाला. तिच्यावर कधीही दबाव टाकला नाही असं नागेश भोसलेंनी सांगितले.
7 / 11
२३ वर्षाची कुहू भारतात फिटनेस कोच आणि एकमेव बिकनी अँथलेट आहे. जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऐमचर ओलंपियामध्ये कुहू भोसलेने ब्रॉंझ मेडल पटकावलं होतं. वूमन बिकनी फिटनेस या स्पर्धेत कुहू नेहमी भाग घेत असते.
8 / 11
वयाच्या १७ व्या वर्षी कुहू भोसलेने जीम ज्वाईन केली होती. १ वर्ष जीम केल्यानंतर त्यांच्या ट्रेनरने एक फिटनेस स्पर्धा पाहण्यासाठी तिला पाठवलं होतं. त्याठिकाणी गेल्यानंतर कुहूला हा खेळ खूप आवडला. आतापर्यंत केवळ पुरूषचं या स्पर्धेत भाग घेतात असं कुहूला वाटत होतं.
9 / 11
कुहू सांगते की, परदेशातील अनेक महिला बॉडिबिल्डिंग क्षेत्रात आहेत. परंतु भारतात खूप कमी प्रमाण पाहायला मिळतं. ही स्पर्धा पाहिल्यानंतर मी या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं ठरवलं. त्यानुसार फिटनेस, ट्रेनिंग आणि डाइट फॉलो करत देशातील टॉप बिकनी अँथलेट बनली.
10 / 11
माझी आई जॉय भोसले आणि वडील नागेश भोसले जे अभिनय क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांनी मला माझं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. जे काही कराल त्याचा आनंद घ्या. आईवडिलांनी मला खूप प्रेम दिले. मी हिंमत दाखवली. कशालाही न घाबरता या क्षेत्रात उतरले.
11 / 11
रँपवर जाऊन मला कधीही लज्जास्पद वाटलं नाही. ज्या क्षेत्रात महिला येण्यापासून घाबरतात मी त्याच क्षेत्रात नाव कमवलं. आजूबाजूला लोकं काय म्हणतात याकडे कधीच लक्ष दिलं नाही. हा खेळ भारतातही प्रसिद्ध व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे असं कुहू सांगते.
टॅग्स :नागेश भोसले