Fighter : मुख्य भूमिकेत असूनही दीपिकाला हृतिकपेक्षा कमी मानधन, 'फायटर'साठी कोणी किती पैसे घेतले? By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 1:24 PM1 / 10बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत असलेला 'फायटर' हा बिग बजेट सिनेमा २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'पठाण' आणि 'वॉर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 2 / 10हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे. 3 / 10२५० कोटींचं बजेट असलेल्या 'फायटर' सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. 4 / 10गेल्या कित्येक दिवसांपासून 'फायटर' सिनेमाची चर्चा होती. आता या सिनेमासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. 5 / 10'फायटर' सिनेमात बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात तो स्कॉर्डन लीडर सरताज गिलच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने २ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 6 / 10अनिल कपूर यांनी 'फायटर' सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. भूमिकेत फिट बसण्यासाठी त्यांनी वजनही कमी केलं होतं. 7 / 10'फायटर'मधील दमदार भूमिका साकारण्यासाठी त्यांनी ७ कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. 8 / 10या सिनेमातील दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. पण, मुख्य भूमिकेत असूनही दोघांच्या मानधनात बराच फरक आहे.9 / 10'फायटर'साठी सर्वाधिक मानधन हृतिक रोशनने घेतल्याची चर्चा आहे. हृतिकने या सिनेमासाठी तब्बल ५० कोटींचं मानधन घेतलं आहे. 10 / 10तर दीपिकाला हृतिकच्या मानधनापेक्षा अर्धीही रक्कम मिळालेली नाही. 'फायटर' सिनेमासाठी दीपिकाला १५ कोटींचं मानधन मिळालं असल्याची चर्चा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications