Join us

अखेर सई ताम्हणकरनं सांगितलं घटस्फोटामागचं खरं कारण, म्हणाली - एकमेकांना ओरबडून...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 1:16 PM

1 / 10
सई ताम्हणकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
2 / 10
मात्र सई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बिनधास्त बोलते. अशाच काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या घटस्फोटाबद्दलही सांगितलं होतं.
3 / 10
लग्न आणि त्यानंतर घटस्फोटाचा निर्णय तिने का घेतला यावरही तिने भाष्य केले होते.
4 / 10
झी मराठीवरील कार्यक्रम 'कानाला खडा' मध्ये सईने हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेते संजय मोने यांनी तिला तिच्या घटस्फोटाच्या पार्टीबद्दल विचारलं होते.
5 / 10
तेव्हा घटस्फोटाचं कारण सांगताना सई म्हणाली, 'माझं आणि अमेय गोसावीचं लग्न झालं होतं. पण आता आमचा घटस्फोट झालाय. पण तो एक खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे त्याचं मन मी आजपर्यंत अनुभवलेल्या माणसांमधलं सगळ्यात सुंदर मन आहे. त्याच्यासाठी माझ्या मनात कायमच एक खास जागा असेल.
6 / 10
पण मला असं वाटतं म्हणजे माझा असा विश्वास आहे की जर का एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार आहे, असे ती म्हणाली.
7 / 10
पण मला असं वाटतं म्हणजे माझा असा विश्वास आहे की जर का एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार आहे, असे ती म्हणाली.
8 / 10
त्यानंतर बोलताना सईने अमेयसोबत घटस्फोट झाल्यानंतर पार्टी केल्याचं देखील म्हटलं होतं. घटस्फोटाच्या कागदांवर सही केल्यावर ते दोघेही जेवायला गेले होते.
9 / 10
तिथे त्यांचे मित्रही आले आणि जेव्हा त्यांना कळालं की त्यांनी घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्यात आणि तरीही ते एकत्र जेवायला आलेत तेव्हा त्यांनी वेगळे होतानाची पार्टी म्हणत एकच कल्ला केला होता.
10 / 10
सई ताम्हणकर शेवटची इंडिया लॉकडाउन या चित्रपटात पाहायला मिळाली.
टॅग्स :सई ताम्हणकर