Join us

पहिलं घटस्फोट, मग आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न; नात्यातील चढउतारांबद्दल पहिल्यांदाच बोलल्या रेणुका शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 6:00 AM

1 / 9
हम आपके है कौन चित्रपटातून अभिनेत्री रेणुका शहाणे घराघरात पोहचल्या. रेणुका शहाणे अभिनेत्रीशिवाय उत्तम दिग्दर्शिकाही आहेत.
2 / 9
अभिनेत्री रेणुका शहाणे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या घटस्फोटाबाबत आणि दुसऱ्या लग्नाबाबतही सांगितले.
3 / 9
पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या की, माझे आईवडील जेव्हा वेगळे झाले. त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर पडला. तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखायचे.
4 / 9
इतकेच नाही तर शिक्षकांनीही माझ्यासोबत असेच काहीसे केले होते. त्रिभंगामध्ये त्या चिमुकल्या मुलीसोबत जे घडते, ज्यामध्ये तिला तिच्या आईबद्दल विचारले जाते, ते खरोखर माझ्या आयुष्यातही घडले आहे.
5 / 9
रेणुका शहाणे यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबत सांगितले. त्या म्हणाल्या की, माझे पहिले लग्न विजय केंकरे यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर आमचा घटस्फोट झाला.
6 / 9
घटस्फोट झाल्यानंतर रेणुका शहाणे यांचे लग्नबद्दल फारसे चांगले मत नव्हते. कारण आधी आईबाबांचा घटस्फोट आणि त्यानंतर आपला.
7 / 9
त्यानंतर त्या आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडल्याचे रेणुका शहाणे यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या लग्नावेळी माझे वय ३५-३६ होते. त्यावेळी मी नात्यातील चढउतारांना चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते, असेही त्यांनी सांगितले.
8 / 9
कोणताही गाजावाा न करता अगदी साध्या पद्धतीने रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्यासोबत मंदिरात लग्न केले.
9 / 9
रेणुका आणि आशुतोष यांना दोन मुले आहेत. त्यांच्यासोबतचे ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
टॅग्स :रेणुका शहाणेआशुतोष राणा