'गदर २' ची बक्कळ कमाई, पण ४ कॅरेक्टरला मिस करतायत चाहते By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:32 AM1 / 10सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 2 / 10तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते. टीझरपासूनच ‘गदर २’ चर्चेत होता. अखेर ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 3 / 10पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. १५ ऑगस्ट रोजी हिंदी चित्रपटांच्या इतिहासात या सिनेमाने नवा विक्रम केला. 4 / 10१५ ऑगस्ट दिवशी देशातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही इतकी 'गदर २' ने केली. ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.5 / 10गदर २ चित्रपटाला चाहत्यांचा उंदड प्रतिसाद मिळत असला तरी या चित्रपटातून गदर सिनेमातील अनेक कलाकारांना मिस केलं जात आहे. त्यात, विशेष म्हणजे अमरीश पुरी आणि ओम पुरी यांना. 6 / 10गदर चित्रपटात अमरिश पुरी यांनी साकारलेला व्हिलन म्हणजे अशरफअली हे कॅरेक्टर बॉलिवूडमध्ये अजरामर झालं आहे. अमरिश पुरींच्या तुलनेत गदर २ चित्रपटातील व्हिलन तितका भाव खात नाही. 7 / 10गदर २ चित्रपटात अशरफ अली यांना पाकिस्तान सरकारने फाशी दिल्याचं दाखवून ते कॅरेक्टर संपवलं आहे. दरम्यान, अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले आहे. 8 / 10अभिनेता ओम पुरी यांनी गदर चित्रपटात आपला आवाज दिला होता. कथावाचकाच्या रुपाने ते या चित्रपटात होते. मात्र, त्यांच्या दमदार आवाजाची उणीव गदर २ मध्ये जाणवते. येथे त्यांच्याजागी नाना पाटेकर यांचा आवाज घेण्यात आला आहे. 9 / 10''गदर'' चित्रपटात तारा सिंगच्या जिगरी मित्राची भूमिका विवेक शौक यांनी निभावली होती. गदर २ मध्ये तारासिंगच्या या मित्राचाही उणीव चाहत्यांना भासते. दरम्यान, जानेवारी २०११ मध्ये विवेक शौक यांचं निधन झालं आहे. 10 / 10अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांनी पाकिस्तानमधील वर्तमानपत्राच्या संपादकाची भूमिका निभावली होती. त्यांचा छोटासा रोलही प्रभावी ठरला होता. दरम्यान, ३ ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications