Join us

संसदेत सनी देओलने ४ वर्षात विचारला १ प्रश्न; उपस्थितीही केवळ १८ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 3:05 PM

1 / 10
भाजप खासदार आणि लोकप्रिय अभिनेता सनी देओल गदर-२ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. गदर-२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींची कमाई केलीय.
2 / 10
केवळ ११ दिवसांत गदर-२ चित्रपटाने ही कमाल करून दाखवली. मात्र, याचदरम्यान, आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सनी देओलने जाहीर केले.
3 / 10
अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू केला. भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओल खासदार बनला. मात्र, खासदार म्हणून सनीची कारकिर्द लक्षवेधी ठरली नाही.
4 / 10
राजकारणात येताच सनी देओलचा अपेक्षा भंग झाला, सनी देओलच्या राजकीय कारकिर्दीने त्याच्या चाहत्यांचाही अपेक्षा भंग झाल्याचं दिसून आलं.
5 / 10
आपल्या खासदारकीच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात सनी देओलने केवळ १ प्रश्न लोकसभेत विचारला. तर, उपस्थितीही फक्त १८ टक्के लावली. संसदेतील खासदारांची सरासरी उपस्थिती ७९ टक्के एवढी आहे.
6 / 10
संसदेतील खासदारांच्या उपस्थितीत पंजाबमधील खासदारांची उपस्थिती सरासरी ७० टक्के आहे. मात्र, सनी देओलने केवळ १८ टक्के उपस्थिती दर्शवली.
7 / 10
सनी देओलने एकही विधेयक संसदेत ठेवले नाही, तर संसदेतील कुठल्याही चर्चेत त्याचा सहभाग दिसून आला. त्यावरुन, अभिनेत्याची नेतेगिरीत रुची नसल्याचे स्पष्ट होते.
8 / 10
दरम्यान, गुरुदासपूर मतदारसंघात सनी देओलची उपस्थिती आणि संसदेतील उपस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळेच, स्थानिक नेते अमरजोत सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सनी देओलची खासदारकी रद्द करण्याचीही मागणी केली होती.
9 / 10
सनी देओलने आजतकशी बोलताना यापुढे निवडणुका लवढणार नसल्याचे स्पष्ट केले. संसदेत देश चालवणारे लोक बसतात, सर्वपक्षीय लोक असतात. मात्र, त्यांचा व्यवहार पाहून आश्चर्य वाटतं.
10 / 10
आपण इतर लोकांना सांगतो, असं वागू नका. मात्र, ससंदेतील व्यवहार पाहून मी त्यांच्यातला नाही, असे मला वाटते. म्हणून, मी अभिनयाच्या क्षेत्रातच ठीक आहे. राजकारणात आता जाणार नाही.
टॅग्स :सनी देओलभाजपाखासदार