मृण्मयी देशपांडेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:13 IST
1 / 9आज राज्यभर नाहीतर देशभर गणरायांच्या (Ganesh Mahotsav 2024) आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतदेखील सेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे.2 / 9अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'बाप्पा मोरया' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं. 3 / 9याशिवाय मृण्मयीनं खास तिचा पती स्वप्नीलसोबत फोटोशूट केलं. या फोटोंना तिनं कॅप्शन दिलं की, 'तुमच्या घरात तुमचे असे perfect वेळी perfect photo कोण काढतं? Tag them…'. त्यांचे हे फोटो मृण्मयीची बहिण गौतमीचा पती स्वानंदने काढलेत. 4 / 9या फोटोंमध्ये मृण्मयी आणि स्वप्नील यांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतोय.5 / 9निळ्या रंगाच्या साडीत मृण्मयीचं सौंदर्य खुलून आलं आहे. कुर्ता पायजम्यात स्वप्नील उठून दिसतोय. दोघंही अगदी शोभून दिसत आहेत.6 / 9 त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे. 7 / 9मृण्मयी ही 3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल राव याच्याशी विवाहबद्ध झाली होती. 8 / 9 मृण्मयी देशपांडेने मुंबईपासून दूर महाबळेश्वरमध्ये तिचा संसार थाटला आहे. 9 / 9महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणातील अनेक फोटो व व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.